दुकान फोडून 10 लाखांच्या सिगारेट चोरीला

0
155

आळंदी, दि. ६ –
आळंदी येथील संभाजी चौकात एक ट्रेडिंग दुकान फोडल्याची घटना मंगळवारी (दि. 2) सकाळी उघडकीस आली. यामध्ये चोरट्याने दुकानातून 10 लाख 38 हजारांच्या सिगारेट चोरून नेल्या आहेत.

वर्धमान प्रमोद बाफना (वय 22, रा. आळंदी) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाफना यांचे वर्धमान ट्रेडिंग नावाचे दुकान संभाजी चौक, आळंदी येथे आहे. सोमवारी रात्री त्यांनी दुकान कुलूप लाऊन बंद केले. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने दुकानाच्या पाठीमागील बाजूचे शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. चोरट्याने दुकानातून 10 लाख 38 हजार 377 रुपये किमतीच्या सिगारेट आणि 72 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 11 लाख 10 हजार 377 रुपयांचा ऐवज चोरून नेला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.