दुकान चालविण्यासाठी दुकानदाराकडे मागितली खंडणी

0
292

निगडी, दि. २२ (पीसीबी)- दुकान चालवायचे असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील, अशा प्रकरे खंडणी मागत एका दुकानदाराला दोघांनी मिळून मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि. 21) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथे विश्वकर्मा ऑटो ग्लास सेंटर दुकानासमोर घडली.

शब्बीर अख्तर सय्यद (वय 30), शब्बीर नदाफ (वय 35, दोघे रा. ओटास्कीम निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सनद रामकेवल विश्वकर्मा (वय 24, रा. ट्रान्सपोर्टनगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विश्वकर्मा त्यांच्या दुकानात काम करत असताना आरोपी दुकानासमोर आले. त्यांनी विश्वकर्मा यांच्याकडे पैशांची मागणी केली. ‘तुला दुकान चालवायचे नाही का. तू आम्हाला ओळखत नाही का. आम्ही दोघे ट्रान्सपोर्टनगरचे भाई आहोत. तुला तुझे दुकान चालवायचे असेल तर पैसे द्यावे लागतील’ अशी आरोपींनी विश्वकर्मा यांना धमकी दिली. त्यांच्या कॉलरला पकडून त्यांना खाली पाडून पैशांसाठी जबरदस्ती केली. पैसे न दिल्यास गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.