हिंजवडी, दि. २७ (पीसीबी)
दुकानातून एका व्यक्तीने सात लॅपटॉप चोरून नेले. ही घटना सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत हिंजवडी येथील परी कॉम्प्युटर्स ग्रँड हायस्ट्रीट येथे घडली.
रमेश के एस वेणुगोपाल (वय ५४, रा. रहाटणी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल रामकृष्ण ढेंगरे (वय ३२, रा. नागपूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल याने फिर्यादी वेणुगोपाल यांच्या दुकानातून एक लाख पाच हजार रुपये किमतीचे सात लॅपटॉप चोरून नेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.