दुकानातील कामगाराने दुचाकीसह पळवली रोकड

0
214

दुकानात काम करणाऱ्या कामगाराने मालकाच्या घरातून 50 हजारांची रोख रक्कम आणि दुचाकी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 7) दुपारी विजयनगर, काळेवाडी येथे घडली.

मोहम्मद वसीम शरीफ सिद्दिकी (वय 24, रा. पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी हर्ष रवी कुंदनानी (वय 23, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिद्दिकी हा फिर्यादी यांच्या दुकानात काम करत होता. फिर्यादी यांच्या गाडीमध्ये ठेवलेली चावी घेऊन सिद्दिकी याने फिर्यादी यांच्या घरातून 50 हजारांची रोख रक्कम चोरली. तसेच फिर्यादी यांची 30 हजारांची दुचाकी घेऊन आरोपी पळून गेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.