वाकड, दि. ६ (पीसीबी) – दुकानावर अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई झाल्याने दुकानातील तीन मुलांनी शेजारच्या दुकानदार महिलेला बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 5) दुपारी गेनूभाऊ कलाटे नगर, वाकड येथे घडली.नितीन इंगोले याच्या मटणाच्या दुकानातील तीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मारहाण झालेल्या महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे गेनूभाऊ कलाटे नगर येथे चिकनचे दुकान आहे. त्यांच्या शेजारी असलेल्या नितीन इंगोले यांच्या मटणाच्या दुकानावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली. त्यावेळी मटणाच्या दुकानातील तीन मुले फिर्यादीजवळ आली. मुलांनी फिर्यादी यांना लोखंडी अँगलने डोक्यात मारून जखमी केले व शिवीगाळ केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.