दुकानदाराला खंडणीची मागणी करत मारहाण, दोघांना अटक

0
135

हिंजवडी,

पिंपरी, दि. १३ ऑगस्ट (पीसीबी) – दुकानदाराला खंडणीची मागणी करत मारहाण करणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि.11) मारुंजी येथे घडली आहे.

याप्रकरणी भागिरथ राम बिष्णोई (वय 21 रा. मारुंजी, मुळशी) येथे घडली आहे. यावरून समीर सोमनाथ जाधव (वय 18) व अनिकेत विकास सपताळे यांना अटक केली असून त्यांच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,, फिर्यादी यांचे मारुंजी येथे सुतारकामाचे दुकान आहे. तेथे आरोपी आले व त्यांनी फिर्यादीला धामकावण्यास सुरुवात केली. त्यांनी फिर्यादी यांना दर महिन्याला खंडणीची मागणी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावरून हिंजवडी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या असून पोलीस पुढील तपास करत आहेत.