दुकानदाराची नजर चुकवून दुकानातील दानपेटी पळवली

0
112

रहाटणी, १७ जुलै (पीसीबी) – दुकानात आलेल्या तोतया ग्राहकांनी दुकानदाराची नजर चुकवून दुकानात ठेवलेली दानपेटी पळवली. त्यामध्ये सुमारे 80 हजार रुपये रोख रक्कम होती. ही घटना 5 जुलै रोजी दुपारी शिवराज नगर कॉलनी, रहाटणी येथे घडली. बहादुरराम हरेरामजी देवासी (वय 21, रा. रहाटणी) यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवासी यांचे शिवराज नगर कॉलनी मध्ये शिव सुपर मार्केट या नावाचे किराणा दुकान आहे. पाच जुलै रोजी दुपारी ते त्यांच्या दुकानात असताना दोन अनोळखी इसम ग्राहक बनून आले. यातील एकाने देवासी यांना दुकानाच्या बाहेर कामात व्यस्त करून दुसऱ्या व्यक्तीने दुकानातील एक हजार रुपये किमतीची स्टीलची दानपेटी चोरून नेली. त्यामध्ये अंदाजे 70 ते 80 हजार रुपये रोख रक्कम होती. वाकड पोलीस तपास करीत आहेत.