दुकानदारांना मारहाण करत खंडणी मागणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

0
86

चाकण, दि. ३० ऑगस्ट (पीसीबी) – दुकानात जाऊन दुकानदारांना मारहाण करत त्यांच्याकडे खंडणीची मागणी करणाऱ्या तरुणा विरोधात चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना चाकण शहरातील महात्मा फुले चौकात गुरुवारी (दि.29) घडली आहे.

याप्रकरणी सुनिल नारायण गेहलोत (वय 36 रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून किरण कचर पवळे ( वय 26 रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या कपड्याच्या दुकानात असताना आरोपी हा दुकानात आला. त्याने टिशर्ट दाखवण्यास सांगितले. फिर्यादी यांनी टि शर्ट दाखवण्यास सुरुवात केली असता आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच फिर्यादी व त्यांच्या कामागाराला जीवे मारण्याची धमकी दिली. महिन्याला हप्त्याची मागणी करत निघून गेला. फिर्यादी यांच्या सह आरोपीने त्याच परिसरातील सलून व स्पा चालक किरण पवळे यांना देखील आरोपीने मारहाण करत हप्त्याची मागणी केली होती. यावरून चाकण पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.