दीपोत्सव विशेष भव्य रांगोळी स्पर्धेत हर्षा देशमुख यांनी पटकाविला प्रथम क्रमांक

0
216

वाकड, दि. १९ (पीसीबी) – माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्या वतीने आयोजित दीपोत्सव विशेष भव्य रांगोळी स्पर्धेतहर्षा देशमुख यांचा प्रथम क्रमांक आला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण अतिशय दिमाखदार सोहळ्यात डॉ. राधिका वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत वाकड येथे संपन्न झाला. डॉ. वाघ यांनी महिलांना आरोग्या विषयी मार्गदर्शन केले.

या सोहळ्याला गायत्री बिरारी, मृण्मयी मंगेशकर, वृषाली कलाटे, अनिता वाडघरे, दिपाली कलाटे, मनीषा वाडघरे, सावेरी कलाटे,दीप्ती कलाटे, प्रियांका कलाटे, सारिका कलाटे, सपना भंडारे, अनुजा कलाटे, सपना कलाटे, मोनिका कलाटे, श्रद्धा कलाटे व इतर मान्यवर,  स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केरत स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्या बद्दल सर्वांचे राहुल कलाटे यांनी आभार मानले.

या स्पर्धेत हर्षा अनंतराव देशमुख यांचा प्रथम, स्मिता भार्गवा द्वितीय तर अनुश्री अलाने यांचा
तृतीय क्रमांक आला. संजीवनी भरगुडे,
ज्ञानेश्वरी पांचाळ यांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले.