दीड लाखाचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त

0
81

महाळुंगे, दि. १४ (प्रतिनिधी)

शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक केल्याप्रकरणी एक महिला आणि एका पुरुष आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एक लाख ४५ हजारांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. १२ नोव्हेंबर रोजी चाकण – तळेगाव रस्त्यावर खालुंब्रे येथे कारवाई करण्यात आली.

पोलिस शिपाई शंकर लालसिंग आडे यांनी या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक महिला आरोपी आणि दयाशंकर दुबे यांच्यावर दुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आरोपीचे किराणा मालाचे दुकान आहे. या दुकानात आरोपीने एक लाख ४५ हजार रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ साठवूण ठेवले. याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत तंबाखूजन्य पदार्थ जप्त करत गुन्हा दाखल केला. महाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करत आहेत.