दीड कोटींची फसवणक; चौघांवर गुन्हा

0
73

पिंपरी, दि. 6 ऑगस्ट (पीसीबी) – कंपनीत गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देतो, असे सांगून अनेकांची एक कोटी 48 लाख 64 हजरी 659 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एमआयडीसी, चिंचवड येथे घडली.

शिल्पा मिलिंद देवळे (वय 39, रा. कस्पटेवस्ती, वाकड) यांनी सोमवारी (दि. 5) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अभिषेक सोमनाथ बिराजदार (वय 35), अक्षदा बिराजदार (वय 28), श्रृती अभिषेक बिराजदार (वय 29, सर्व रा. बाणेर, पुणे) आणि दुर्गेश उत्पात (वय 43, रा. रावेत) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना 2018 ते 22 सप्टेंबर 2023 या कालावधीत भोला हॉटेल, केएसबी कंपनीजवळ, एमआयडीसी भोसरी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी व इतर लोकांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देतो, असे सांगून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादी यांनी गुंतवणूक केलेल्या आठ लाख 76 हजार 854 रुपयांचा परस्पर अपहार केला. तसेच इतर लोकांचाही एक कोटी 39 लाख 87 हजार 805 रुपयांचा अपहार करीत सर्वांची एकूण एक कोटी 48 लाख 64 हजार 659 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.