दि सेवा विकास बँकेच्या कर्मचा-यांचे आंदोलन

0
197

पिंपरी दि. १२ (पीसीबी) – आर्थिक अडचणीत असलेल्या पिंपरीतील दि सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआयने) परवाना रद्द केल्याने बँकेचे कामकाज बंद झाले असून बँकेच्या सुमारे 300 कर्मचा-यांचे भवितव्य अंधारात आले. या कर्मचा-यांनी आज (बुधवारी) बँकेच्या पिंपरी कॅम्पातील मुख्य शाखेसमोर आंदोलन केले.

नियमांना तिलांजली देवून निर्णय होवू लागले. कागदपत्रांची पूर्तता होत नसतानाही कोट्यवधींची कर्जे मंजूर करण्यात आली. या गैरकारभाची तक्रार करण्यात आली. चौकशीत विविध 124 प्रकरणात 400 कोटीहून अधिक रुपयांचे कर्जवाटप नियमबाह्य पद्धतीने झाल्याचे निष्प्न झाले. याप्रकरणी गुन्हेही दाखल झाले.बँकेवर प्रशासक नेमण्यात आला होता. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईच्या शक्‍यता नाहीत. त्यामुळे बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या विविध तरतुदींचे पालन करण्यात बँक अयशस्वी ठरल्याचा ठपका ठेवत आरबीआयने बँकेचा परवाना रद्द केला. त्यामुळे बँकेतील  सुमारे 300 कर्मचा-यांचे भवितव्य अंधारात आले असून कर्मचा-यांनी आज (बुधवारी) बँकेच्या पिंपरी कॅम्पातील मुख्य शाखेसमोर आंदोलन केले. 

“बचाव बचाव बँक बचाव”, “वाचवा रे वाचवा बँक वाचवा”, “300 कामगारांनी कोणाकडे जायचे”, “बँकेचे नुकसान करणाऱ्यांचा धिक्कार असो”, “बँकेचे वाटोळे करणाऱ्यांचा धिक्कार असो” अशा जोरदार घोषणा कर्मचाऱ्यांनी दिल्या.