दिशा फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी बाळासाहेब जवळकर

0
192

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील अग्रगण्य अशा, दिशा सोशल फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या (एनजीओ) अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार व लेखक बाळासाहेब जवळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. मावळचे अध्यक्ष जगन्नाथ (नाना) शिवले यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दिशा फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक हॉटेल सावली (निगडी) येथे पार पडली. यावेळी नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

६ एप्रिल २००६ रोजी दिशा फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. प्रारंभीच्या काळात २०११ पर्यंत जवळकर हे अध्यक्षपदावर होते. त्यानंतर, गोरख भालेकर आणि नाना शिवले यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. आता सर्वानुमते पुन्हा एकदा बाळासाहेब जवळकर यांच्याकडे दिशाच्या अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीत संतोष बाबर (उपाध्यक्ष), संतोष निंबाळकर (सचीव) आणि नंदकुमार कांबळे (खजिनदार) यांचीही निवड करण्यात आली आहे. गोरख भालेकर, जगन्नाथ (नाना) शिवले, सचिन साठे, डॉ. श्याम अहिरराव, भरत आल्हाट, राजू सावंत हे मार्गदर्शक असणार आहेत.