दिव्यांग व्यक्तीशी लग्न केल्यास अर्थसहाय्य योजना; 5 वर्षात 63 जणांनी घेतला लाभ

0
214

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्यास त्यांच्या संसारासाठी 1 लाख रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. गेल्या 5 वर्षांत या योजनेचा शहरातील 63 जोडप्यांनी लाभ घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. याचबरोबर शहरातील दिव्यांग व्यक्तींसाठी दिव्यांग कक्षामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा शहरातील दिव्यांग बांधवांना मोठा आधार होत असून जीवन सुकर होण्यासाठी लाभ होत आहे.

दिव्यांग व्यक्तींना समाजात वावरता अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे 40 टक्‍यांपेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाण असल्यास अशा दिव्यांगाशी अव्यंग व्यक्तीने विवाह केल्यास त्यांना पालिकेतर्फे प्रोत्साहन म्हणून एक लाख रूपये देण्यात येतात. ही योजना महापालिकेने 2018 पासून सुरू केली असून आत्तापर्यंत 63 जणांनी या योजनेला लाभ घेतला आहे.

2018 ला ही योजना सुरू करण्यात आली असली तरी पहिल्या वर्षी एकाही जोडप्याने या योजनेचा लाभ घेतला नाही. त्यानंतर 2019-20 मध्ये 20, 2020-21 मध्ये 20, 2021-22 मध्ये 19 तर 20202-23 मध्ये जुलैअखेर 4 अशा 63 जणांना 63 लाख रूपयांचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेसाठी दरवर्षी 20 लाखांची तरतूद करण्यात येते.