दिवाणी न्यायाधीशांनी दिली वकील व कर्मचा-यांना मतदानाची शपथ…

0
32

पिंपरी, दि. 06 (पीसीबी) :  दिवाणी व फौजदारी न्यायालयातील सर्व वकील तसेच कार्यालयीन अधिकारी कर्मचा-यांनी २०नोव्हेंबर रोजी येणा-या विधानसभा निवडणूकीत मतदानाचा महत्त्वपूर्ण हक्क बजावून लोकशाही उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन पिंपरी न्यायालयाचे सह दिवाणी न्यायाधीश व प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एम.जी.मोरे यांनी केले.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांचे निर्देशानुसार २०६, पिंपरी (अ.जा.) विधानसभा कार्यालयामार्फत कार्यक्षेत्रात व्यापक प्रमाणात मतदान जनजागृती करण्यात येत आहे. त्यानुसार आज पिंपरी दिवाणी व फौजदारी न्यायालयात मतदान जनजागृती करण्यात आली. त्यावेळी सह दिवाणी न्यायाधीश एम.जी.मोरे यांनी आवाहन मतदान करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात पिंपरी न्यायालयाचे सह दिवाणी न्यायाधीश एम.जी.मोरे यांच्या उपस्थ‍ितीत सर्वांनी “ आम्ही भारतीय नागरीक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु” अशी शपथ घेतली व १०० टक्के मतदान करण्याचा निर्धार केला.

या मतदान जनजागृती कार्यक्रमास स्वीप नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, पिंपरी न्यायालयातील अॅड. अरुण खरात, अॅड. नारायण थोरात, अॅड. अजय यादव, अॅड. भिकाराम कांबळे, अॅड. संगीता कुशलकर, अॅड. अनिल डांगे, अॅड. संभाजी भावले, अॅड. दत्ता झुळूक, अॅड. प्रतिक जगताप, अॅड. अजय यादव, अॅड. पी.एस.कांबळे, अॅड. अनिल डांगे, अॅड. संभाजी भावले, अॅड. तुषार खरात, अॅड. नारायण रसाळ, अॅड. संगीता कुशलकर, अॅड. प्रमिला गाडे, तर अॅड.दिपक कांबळे, अॅड. सखाराम गालफाडे, अॅड.महिंद्रा काकड, अॅड.हर्षद ओव्हाळ, अॅड.राकेश अकोले, अॅड. पी.एस. कांबळे, अॅड.अशोक बढेकर, अॅड.मोमीन शेख,अॅड.राधा जाधव तसेच बाबू जगताप, कैलास भानवसे,संजय साळवे न्यायालयाच्या सहाय्यक अधिक्षक आर.एम.चव्हाण, फातिमा शेख, लघुलेखक आर.ए.लोंढे, बी.एच.जमखंडी, व्ही.जी.फुलारी, एम.एस.झाडे, एस.एम.गाडे, पी.डी.कदम, आर.व्ही.बेलदार, पी.बी.मिरघे, के.मु.पवार, एच.ए.शेख, एस.बी.मणेर, प्रविण वाडेकर, मारुती वाघमारे, सचिन कोळी तसेच स्वीप विभागाचे संदीप सोनवणे, महालिंग मुळे, महादेव डोंगरे हे उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमांत मतदान करण्यासाठी उपयुक्त अशा शासकीय माहिती पत्रकांचे सर्वांना वाटप करण्यात आले असून या पत्रकात मतदान प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन देखील करण्यात आले असल्याची माहिती स्वीप नोडल अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी उपस्थितांना दिली.

कोट-

पिंपरी विधानसभा कार्यक्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढणेसाठी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. गेल्या निवडणूकीत कमी मतदान झालेल्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून त्या ठिकाणी मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याशिवाय या कार्यक्षेत्रातील सोसायटया, समाज मंदिरे, प्रवासी वाहतूकीची ठिकाणे यांसह दाट वस्तीच्या व गर्दीच्या ठिकाणी मतदार जनजागृती करण्यात येत आहे. या निवडणूकीत सोसायटयांमध्ये ६ नवीन मतदान केद्रांचा समावेश झाल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ होणार आहे. – अर्चना यादव, निवडणूक निर्णय अधिकारी