दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबीयात कोणताही अंतर्गत कलह नाही….! भाजपा आमदार महेश लांडगे

0
363

चिंचवड, दि. ३ (पीसीबी)- चिंचवड विधानसभेचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधना नंतर त्यांच्या कुटुंबातील कुणाला उमेदवारी द्यायच यावर अजूनही भाजपच एकमत झालं नाहीय असं असताना जगताप यांचे बंधू शंकर जगताप आणि पत्नी अश्विनी जगताप या दोघांनीही उमेदवारी अर्ज घेतल्याने कुटुंबात कलह असल्याची चर्चा सुरू झाली होती .

मात्र जगताप कुटुंब हे एकत्रित कुटुंब पद्धतीतील कुटुंब असल्याने त्यांच्याच कुठलाही वाद असूच शकत नाही असा विश्वास देत केवळ राजकारणातील रणनीती म्हणून दोघांनीही उमेदवारी अर्ज विकत घेतल्याचे सांगत भाजपचे आमदार तथा शहर अध्यक्ष महेश लांडगे यांनी जगताप कुटुंबात कलह असल्याच्या चर्चेला विराम देण्याचा प्रयत्न केलाय मात्र अंतर्गत कलहाचे आरोप होत असताना देखील आपल्यात खरचं वाद आहेत का किंवा दोघेही निवडणूक लढविणार आहेत का या बाबत शंकर जगताप किंवा अश्विनी जगताप या दोघांकदडूनही अद्याप कुठलाच खुलासा केला गेला नाहीय.