पिंपरी, दि. ८ (पीसीबी)- दिल्लीतील महापालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने 134 जागांवर विजय मिळवून सत्ताधारी भाजपची गेल्या 15 वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आणली आहे. या विजयाचा पिंपरी-चिंचवड शहर आम आदमी पार्टीने पेढे वाटून, नगारे वाजवून साजरा केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे जल्लोश साजरा केला. यावेळी यल्लाप्पा बालदोर, अजय सिंग, वहाब शेख, मंगेश आंबेकर, संदीप राठोड, चेतन बेंद्रे, सुरेश भिसे, संतोष बागाव, ज्योती शिंदे, शुभम यादव, मीना चंद्रमणी जावळे, सीमा यादव, मैमुना शेख, स्मिता पवार, अमर डोंगरे, देवेंद्र सिंग यादव, डॉ. रामेश्वर मुंडे, ब्रह्मानंद जाधव, चांद मुलानी, प्रीती राक्षे, रोहित सरनोबत, रशीद अत्तार, अनिषा राक्षे, बाळू भंडारी, स्वप्निल जेवळे, किसन चावरिया, दीपक श्रीवास्तव, वैजनाथ शिरसाठ गोविंद माळी, वाजिद शेख कार्यकर्ते उपस्थित होते.
आम आदमी पार्टीने सामान्य व मध्यमवर्गीय शहरी नागरिकांना मूलभूत सेवा दिल्या आहेत. आम आदमी पार्टी कोणत्याही फसव्या व पोकळ घोषणा देत नाही. अरविंद केजरीवाल यांनी बरेच काही करून दाखवले आहे. केंद्रातील भाजप सरकारवर आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही. भाजपच्या राजकारणाला आता उतरती कळा लागली असल्याची प्रतिक्रिया आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिली.