दिल्ली दारु घोटाळा प्रकरणाला वेगळे वळण; सीबीआयकडून आता ईडीच्याच अधिकाऱ्याला अटक…!

0
497

नवी दिल्ली,दि.२९(पीसीबी) – दिल्लीतील दारु घोटाळा प्रकरणात नवा ट्वीस्ट आला आहे. आता केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयकडून या प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्याला अटक केली आहे. या अधिकाऱ्यावर दारु घोटाळा प्रकरणातील आरोपीकडून पाच कोटींची लाच घेतल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात नवा ट्वीस्ट समोर आला आहे. सीबीआयने या प्रकरणी ईडीचे सहायक संचालक पवन खत्री, एअर इंडियाचे कर्मचारी दीपक सांगवान, क्लेरिजेस हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सचे सीईओ विक्रमादित्य आणि इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली दारू घोटाळा प्रकरणाच्या तपासादरम्यान ईडीच्या (ED) वरिष्ठ अधिकार्‍यांच्या नावाने लाच घेणारा गट कार्यरत असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. ईडीचे सहाय्यक संचालक पवन खत्री यांना मद्यविक्रेते अमनदीप धल्ल यांच्याकडून पाच कोटी रुपयांच्या कथित पेमेंटप्रकरणी अटक केली आहे.

दारु घोटाळा प्रकरणात याआधी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली होती. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजेरी केला असता न्यायालयाने सिसोदियांना नवीन बँक खाते उघडून पगार काढण्याची परवानगी दिली आहे. या प्रकरणी आता ईडीच्याच अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्याने नवा ट्वीस्ट आला आहे.