दिल्लीमध्ये पारा 52.3 अंशावर

0
129

दि २९ मे (पीसीबी ) – उत्तर भारतात सध्या उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. दिल्लीमध्ये सूर्य आग ओकतोय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण, दिल्लीमध्ये भीषण उष्णतेची लाट आली आहे. भारताची राजधानी नवी दिल्ली येथे 50 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली असून, तीव्र उष्णतेची लाट कायम आहे. दिल्लीत 52.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उत्तर भारतात सध्या तीव्र उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. त्यातच दिल्लीत तापमानाचा पार 50 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे.
हवामान विभागाने आज दिल्लीसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला होता. दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसात रेकॉर्ड ब्रेक गरमी पाहायला मिळत आहे. आज बुधवारी राजधानी दिल्लीतीन मुंगेशपूर भागात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. दिल्लीच्या मुंगेशपूरमध्ये 52.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली आहे, पण दिल्लीला मान्सून दाखल होईपर्यंत संपूर्ण जून महिना निघून जाईल. हा महिना दिल्लीकरांना आणखी रडवणार आहे, असं हवामान खात्यानं सांगितलं आहे. दिल्लीतील बहुतांश भागात आज पारा 50 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचला आहे. नोएडा, फरिदाबाद, गाझियाबाद, गुडगावचीही तीच अवस्था आहे. दिल्लीतील तीन भाग सर्वाधिक तापलेले आहेत. मुंगेशपूरमध्ये सोमवारी पारा 48.8 अंशांवर पोहोचला होता.
दिल्लीमध्ये तीव्र उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. दिल्लीतील तीव्र ऊन, आर्द्रता आणि उष्णतेच्या लाटेमुळे लोक हैराण झाले आहेत. ताज्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 11.30 वाजता दिल्लीच्या नरेलामध्ये 47 अंश सेल्सिअस आणि नजफगढमध्ये 46.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर दुपारी तीन वाजेपर्यंत पारा 52.3 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. दिवसागणिक दिल्लीचा पारा वाढताना दिसत आहे.