दिरासोबत मिळून पत्नीने केला पतीचा खून

0
112

दि ३० एप्रिल (पीसीबी ) – दिरासोबत मिळून पतीच्या डोक्यात हत्याराने मारून त्याची पत्नीने निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर खुनाचा पुरावा नष्ट करून पतीने आत्महत्या केल्याचा बनाव केला. हा बनाव उघड करत पोलिसांनी पत्नी आणि तिच्या दिराला अटक केली. ही घटना रविवारी (दि. 28) रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास थोरवे वस्ती, चऱ्होली येथे घडली.

हुजूर महंमुद सय्यद (वय 32, रा. थोरवे वस्ती, चऱ्होली) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. सय्यद यांची 28 वर्षीय पत्नी आणि फिरोज महंमुद सय्यद (वय 38, रा. मासाला खुर्द, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) या दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अनिल लोहार यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोरवे वस्ती, चऱ्होली येथे एका व्यक्तीने आत्महत्या केल्याबाबत आळंदी पोलिसांना रविवारी रात्री माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हुजूर सय्यद यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता सय्यद मयत झाले होते. सय्यद यांनी घरात भिंतीला धडक घेऊन आत्महत्या केल्याचे त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले.

मात्र, पोलिसांना यात संशयास्पद वाटल्याने त्यांनी खुनाच्या अनुषंगाने चौकशी . सय्यद यांना झालेली जखम, घटनास्थळावरील परिस्थिती, मयताची स्थिती आणि त्यांच्या मुलीने दिलेली माहिती ही सय्यद यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीशी सुसंगत नव्हती. तसेच पत्नीने घरातील रक्ताचे डाग साफ केले होते. त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केली असता सय्यद यांची पत्नी आणि भाऊ या दोघांनी मिळून त्यांचा खून करून हत्याराची विल्हेवाट लावली असल्याचा संशय चौकशीत व्यक्त होत आहे. आळंदी पोलिसांनी पत्नी आणि दिराला अटक केली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.