दिनेश वाघमारे राज्य निवडणूक आयुक्तपदी

0
4

मुंबई,दि.21 (पीसीबी) : सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी नवीन आयुक्तांवर असेल. यू.पी.एस. मदान यांची मुदत गेल्या सप्टेंबरमध्ये संपल्यापासून निवडणूक आयुक्तपद रिक्त होते. या पदासाठी वाघमारे यांच्यासह नितीन करीर, राजीव जलोटा, राजकुमार देवरा ही नावे चर्चेत होती. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून वाघमारे यांनी काम पाहिले आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत निवडणूक आयुक्तपदाचा निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आले होते. यानुसार दिनेश वाघमारे यांच्या नावाची शिफारस राज्यपालांना करण्यात आली होती. राज्यपाल राधाकृष्णन यांनी सरकारची शिफारस मान्य करीत दिनेश वाघमारे यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. वाघमारे हे मूळचे नागपूरचे असून, त्यामुळेच त्यांच्या नावाला पसंती मिळाल्याची कुजबूज मंत्रालयीन वर्तुळात होती.

वाघमारे यांनी नवी मुंबई व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त, ऊर्जा, सामाजिक न्याय विभागांचे सचिव, विभागीय आयुक्त, विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव अशा विविध पदांवर काम केले आहे.मुंबई : सनदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी नवीन आयुक्तांवर असेल. यू.पी.एस. मदान यांची मुदत गेल्या सप्टेंबरमध्ये संपल्यापासून निवडणूक आयुक्तपद रिक्त होते. या पदासाठी वाघमारे यांच्यासह नितीन करीर, राजीव जलोटा, राजकुमार देवरा ही नावे चर्चेत होती.

गेल्या आठवड्यात झालेल्या राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत निवडणूक आयुक्तपदाचा निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आले होते. यानुसार दिनेश वाघमारे यांच्या नावाची शिफारस राज्यपालांना करण्यात आली होती. राज्यपाल राधाकृष्णन यांनी सरकारची शिफारस मान्य करीत दिनेश वाघमारे यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. वाघमारे हे मूळचे नागपूरचे असून, त्यामुळेच त्यांच्या नावाला पसंती मिळाल्याची कुजबूज मंत्रालयीन वर्तुळात होती.

वाघमारे यांनी नवी मुंबई व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त, ऊर्जा, सामाजिक न्याय विभागांचे सचिव, विभागीय आयुक्त, विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव अशा विविध पदांवर काम केले आहे.