दिड किलो गांजासह तरुणाला चिखलीतून अटक

0
221

चिखली, दि. २१ (पीसीबी) -दिड किलो गांजासह तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने चिखली येथून अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.20) चिखली रोड येथे करण्यात आली आहे.

तालिब लतीफ मोहम्मद (वय 23 रा.चिखली) असे अटक आरोपीचे नाव आहे. तसेच त्याचे साथीदार दोन महिला, सोहेल अस्लम समलेवाले (रा. चिंचवड) यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अमंली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून तालिब याला अटक केली. यावेळी त्याच्याकडून 92 हजार रुपयांचे 1 किलो 588 ग्रॅम वजनाचा गांजा, रोख रक्कम, मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी हा सोहेल व महिला आरोपीच्या सांगण्यावरून गांजा विकत होता. तर त्याने तो गांजा दुसऱ्या महिला आरोपीकडून आणला होता. यावरून चिखली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.