दिघी मध्ये साऊंड सिस्टिमचे गोडाऊन फोडले

0
92

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) दिघी,

दिघी मध्ये साऊंड सिस्टिमचे गोडाऊन फोडले. गोडाऊन मधून चार लाख 45 हजार रुपये किमतीचे साऊंड सिस्टिम चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 18) दुपारी आदर्शनगर येथे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

किशोर दादा साळवे (वय 28, रा. विश्रांतवाडी), प्रल्हाद ज्ञानेश्वर पारवे (वय 25, रा. चऱ्होली), राम कल्याण कांबळे (वय 27, रा. भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी समीर ज्ञानोबा ढगे (वय 42, रा. भोसरी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ढगे यांचे आदर्शनगर, दिघी येथे साऊंड सिस्टिमचे गोडाऊन आहे. चोरट्यांनी 13 जुलै ते 18 जुलै या कालावधीत गोडाऊनचे लॉक तोडून गोडाऊन मध्ये प्रवेश केला. गोडाऊन मधून चार लाख 45 हजार रुपये किमतीचे साउंड सिस्टिम चोरट्यांनी चोरून नेले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.