दिघी मध्ये दोन लाख 82 हजारांची घरफोडी

0
82

दिघी, दि.12 जुलै (पीसीबी) – दिघी मधील काटे वस्ती येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दोन लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 11) मध्यरात्री साडेबारा ते पहाटे सव्वाचार वाजताच्या सुमारास घडली.

समीर दिनकर कोपर्डे (वय 42, रा. काटे वस्ती, दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे जुने घर दिघी येथे आहे. त्यांचे घर कुलूप लावून बंद असताना गुरुवारी मध्यरात्री साडेबारा ते पहाटे सव्वाचार वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. समीर यांच्या भावाच्या बेडरूम मधील कपाटातून 9.8 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, दोन किलो चांदीची ताटे आणि रोख रक्कम असा एकूण दोन लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.