दिघी, निगडी मध्ये गुटखा विक्री प्रकरणी दोन कारवाया

0
259
  • एक लाख 33 हजारांचा गुटखा जप्त

दिघी आणि निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा विक्री प्रकरणी कारवाया करण्यात आल्या. यामध्ये एक लाख 33 हजार 201 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

निगडी पोलीस ठाण्यात विशाल शहाजी जगताप (वय 21, रा. आकुर्डी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगताप याने गंगानगर येथील पांढरकर उद्यानाच्या बाहेर असलेल्या टपरी मध्ये गुटखा विक्रीसाठी ठेवला. याप्रकरणी निगडी पोलिसांनी सोमवारी (दि. 8) कारवाई करून 65 हजार 326 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चऱ्होली बुद्रुक येथे खंडणी विरोधी पथकाने कारवाई करून 67 हजार 875 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी सत्यं सिंग कमलेश सिंग परिहार (वय 24, रा. चऱ्होली बुद्रुक) आणि आशिष अशोक जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवला होता. दिघी पोलीस तपास करीत आहेत.