दिग्गज नेत्याला पराभूत करून वयाच्या 25 व्या वर्षी आमदार; “अजून मला…” रोहित पाटील म्हणाले

0
46

तासगाव कवठेमहांकाळ, दि. 25 (पीसीबी) : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे. आता त्या निकालाचे कवित्व राहिले आहे. अनेक ठिकाणी आश्चर्यकारक निकाल आले. महायुतीच्या लाटेतही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे रोहित पाटील निवडून आले. वयाच्या 25 व्या वर्षी रोहित पाटील आमदार झाले. माजी उपमुख्यमंत्री आर.आर पाटील म्हणजेच आर.आर.आबांचे ते चिरंजीव आहेत. तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात माजी खासदार संजयकाका पाटील यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाने उमेदवारी दिली होती. या दिग्गज नेत्याला पराभूत करण्याचा करिश्मा प्रतिकुल परिस्थिती रोहित पाटील यांनी केला. त्यानंतर ते म्हणाले, मी आमदार झालो हे अजूनही मला पटत नाही. पण लोकांनी मला आमदार केले आहे.

रोहित पाटील म्हणाले, मी आमदार झालो हे अजूनही मला पटत नाही. पण लोकांनी मला आमदार केले आहे. मला माझ्या कष्टाचा फळ मिळाले आहे. तसेच राज्याच्या हितासाठी जे प्रश्न मला विधानसभेत मांडायचे ते मी मांडणार आहे. गेली काही वर्ष जे कष्ट केले त्या कष्टाचा हे फळ या मतदारसंघातल्या लोकांनी दिले आहे. येत्या काळामध्ये जे काम अनौपचारिक पद्धतीने करत होतो ते आता औपचारिक पद्धतीने करणार आहे. तासगाव तालुक्यात नवनवीन कंपन्या आणण्याचे काम करणार आहे. तसेच राज्यातील उद्योग बाहेर जात आहेत हा चिंतेचा विषय आहे. त्या प्रश्नाकडे लक्ष देणार आहे. बेरोजगारांना रोजगारांच्या संधी देणार आहे. आरोग्याचे समस्या आहेत, त्याही सोडवणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.

राज्यातील तरुण उमेदवार आणि स्वर्गीय आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी आपल्या आमदारकीचा पहिला दिवस सकाळी औक्षण करून सुरुवात केली. यावेळी ग्रामस्थांच्या भेटीगाठी आणि समस्या जाणून घेण्यासाठी पहिला दिवसापासून सुरुवात केली आहे. यावेळी रोहित पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती. राज्याच्या हिताच्या साठी जी भूमिका मला घ्यावी लागेल आणि जे प्रश्न आम्हाला मांडावे लागतील ते मी विधानसभेत मांडणार असल्याचे रोहित पाटील यांनी सांगितले.