दारू विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल

0
20

पिंपरी, दि. 16 (पीसीबी) : बेकायदेशीरपणे दारूची विक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई रविवारी (दि. 15) सायंकाळी शगुन चौक, पिंपरी येथे करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शगुन चौक पिंपरी येथे एक महिला बेकायदेशीरपणे दारू विक्री करत असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत महिलेवर गुन्हा दाखल केला. महिलेच्या ताब्यातून 40 लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.