दारू विक्री प्रकरणी महिला ताब्यात

0
47

आळंदी, दि. 19 : बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्याकडून 117 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 18) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास धानोरे गावात केली.

पोलीस अंमलदार योगेश्वर कोळेकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरे गावात एक महिला बेकायदेशीरपणे दारू विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून 11 हजार 700 रुपये किमतीची 117 लिटर गावठी दारू जप्त केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.