दारू विक्री प्रकरणी तरुणावर गुन्हा

0
681

निगडी, दि. १ (पीसीबी) – देशी, विदेशी दारू विक्री प्रकरणी निगडी पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई मंगळवारी (दि. 31) सायंकाळी साडेपाच वाजता ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथे सर्जा हॉटेल जवळ करण्यात आली.

शुभम अशोक लोहार (वय 26, रा. ट्रान्सपोर्टनगर, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार नंदकुमार ओंबासे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने देशी, विदेशी दारू विक्रीसाठी घरात ठेवली असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुभम लोहार याच्या घरावर छापा मारून कारवाई करत मॅकडॉल्स नंबर वन व्हिस्की, इम्पिरियल ब्ल्यू, सुपेरीयर ग्रेन व्हिस्की, देशी दारू पॉवर लाईम पंचच्या बाटल्या असा एकूण 20 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.