दारू, मटण, मासे आखाडपार्टीचा संस्कार भाजप, संघाचा आहे का ?

0
176

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – दरवर्षी हजारो लिटर दारू, कित्येत टन मटन आणि मासे आखाड पार्टीच्या निमित्ताने मतदारांना खायला घालायचा संस्कार संघ, भाजपचा आहे का, असा रोकडा सवाल पूर्वाश्रमिचे भाजपचे शहर पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आठवडाभर विविध ठिकाणी ३८ आखाड पार्ट्यांचे आयोजन केले असून एका प्रसिध्दी पत्राद्वारे काळभोर यांनी त्याचा निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अशा प्रकारे दारू, मटन पार्ट्यांवरून जाहीर सभांतून टीका करत असताना त्यांच्याच पक्षाचे आमदार जर असे वर्तन करतात याकडे काळभोर यांनी लक्ष वेधले आहे.
प्रसिध्दीपत्रात ते म्हणतात, भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे ह्यांच्या कडून ३८ ठिकाणी मांस मटण आखाड पार्टी जेवण ठेवण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे हाच उद्योग सुरू आहे, आता त्यासंदर्भात सखोल चौकशी करण्यात यावी. करोडो रुपये खर्च करून भोसरी विधानसभा मतदारसंघ ह्या ठिकाणी आखाड पार्टी जेवण देण्यात येते. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघात आमदार महेश लांडगे चर्चेचा विषय ठरले आहेत. मतदार संघातील विकासकामे संथ गतीने सुरू असताना अशा प्रकारे कोट्यवधी रुपये खर्च करून मतदारांना खूश करण्याचे हे उद्योग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या संस्कारात बसते का
निगडी भागातील पीसीएमसी कॉलनी इमारत जीर्ण अवस्थेत आहे. इमारत धोकादायक झाली असून ७७४ कुटुंब पीसीएमसी कॉलनी येथील धोकादायक इमारती मध्ये वास्तव्य करत आहेत. ५० वर्ष जास्त कालावधी झाला असून पुनर्वसन होतं नाही. दुसरीकडे निगडी येथील सेक्टर २२ जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजनेंतर्गत घरकुल इमारत पूर्ण झाल्या असून त्या ठिकाणी ९२० पात्र लाभार्थी ह्यांना घरकुल इमारत मधील घर मिळत नाही. गेल्या १४ वर्ष निगडी येथील जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजना अंतर्गत घरकुल मिळण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना पायपीट करावी लागते.
पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्त तसेच सक्त वसुली सचनालय तथा इडी, इन्कम टॅक्स विभाग ह्यांनी ह्या संदर्भात आमदार महेश लांडगे ह्याची आखाड पार्टी जेवण करोडो रुपये खर्च चौकशी करावी, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.