शिरगाव, दि. २०(पीसीबी)- दारू भट्टी लावल्या प्रकरणी शिरगाव पोलिसांनी एका महिलेवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई मंगळवारी (दि. 19) सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास बेबडओव्हळ गावात करण्यात आली.
पोलीस अंमलदार शुभम राजगुरे यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आढले येथील एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळ मिश्रित कच्चे रसायन साठवले. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी तिच्या दारू भट्टीवर छापा मारला. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी महिला पळून गेली. पोलिसांनी एक लाख 20 हजारांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत