महाळुंगे, दि. १५ (पीसीबी)
पत्नीने दारू प्यायला पैसे दिले नाहीत म्हणून पतीने तिला बेदम मारहाण करत सिमेंटचा मोठा दगड पत्नीच्या अंगावर टाकून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि. १४) सकाळी कुरुळी येथे घडली.
कृष्णा संतोष कदम (वय १८, रा. कुरुळी, ता खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष सिद्राम कदम (वय ४२) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील आरोपी संतोष याने पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पत्नी पैसे देत नसल्याने संतोष याने पत्नीला शिवीगाळ करून हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जीवे मारण्याच्या उद्देशाने उखळातील भात्याने पत्नीला डोक्यात ठिकठिकाणी मारून गंभीर जखमी केले. आता हिला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत कपडे धुण्यासाठी मांडलेला सिमेंटचा मोठा दगड उचलून पत्नीच्या अंगावर घातला. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी संतोष कदम याला अटक केली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.