दारू प्यायला पैसे न दिल्याने मोठ्या भावाला जिवे मारण्याचा प्रयत्न

0
403
fight

पुणे, दि. २३ (पीसीबी) – दारू प्यायला पैसे न दिल्याने एका तरुणाने त्याच्या मोठ्या भावाला लोखंडी रॉडने डोक्यात मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (दि. 22) सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास आळंदी येथे घडली.

महेश विष्णू देवकाते (वय 33, रा. केळगाव, ता. खेड) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार महादेव विष्णू देवकाते (वय 26, रा. चऱ्होली खुर्द, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश हे आळंदी येथे संदीप कायस्थ यांच्या फुलांच्या दुकानावर काम करत होते. गुरुवारी सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास त्यांचा लहान भाऊ महादेव तिथे आला. त्याने महेश यांच्याकडे दारू पिण्यासाठी एक हजार रुपये मागितले. त्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. महादेव याने महेश यांना लोखंडी रॉडने डोक्यात मारून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच आळंदी येथील माऊली मंदिर परिसरातील सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.