दारू प्यायला पैसे न दिल्याने तरुणास मारहाण

0
220

चऱ्होली, दि. २४ (पीसीबी) : दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता त्यासाठी नकार दिला. त्या कारणावरून पैसे न देणाऱ्या व्यक्तीच्या भावाला मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि. 21) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास दाभाडे चौक चऱ्होली येथे घडली.

शैलेश खाडे (वय 26, रा. आळंदी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सागर भाऊसाहेब गरजे (वय 30, रा. आळंदी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शैलेश याने फिर्यादी सागर यांच्या भावाकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. ते पैसे देण्यासाठी सागर यांच्या भावाने नकार दिला. त्या कारणावरून शैलेश हा सागर यांच्या घरी आला. त्याने सागर यांच्या भावाचा अपघात झाला आहे, अशी खोटी माहिती सांगून सागर यांना दाभाडे चौकाजवळ नेले. तिथे सागर यांना शिवीगाळ करून हाताने व दगडाने मारहाण करत गंभीर जखमी केले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.