दारू प्यायला पैसे न दिलेले दोन वाहने पेटवली

0
41

चिखली, दि. 19 (प्रतिनिधी) : दारू प्यायला पैसे न दिल्याने दोन अल्पवयीन मुलांनी हॉटेल व्यवसायिकाच्या खिशातून जबरदस्तीने पाचशे रुपये काढून घेतले. त्यानंतर दोन वाहने पेटवली. तसेच इतर वाहनांची तोडफोड करत नुकसान केले. ही घटना रविवारी (दि. 17) रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास कृष्णा नगर भाजी मंडई चौक, चिखली येथे घडली.

याप्रकरणी हॉटेल व्यवसायिक मगन देवासी यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवासी हे हॉटेल व्यवसायिक आहेत. दोन अल्पवयीन मुलांनी त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली. त्यावरून देवासी यांना शिवीगाळ करून जबरदस्तीने त्यांच्या शर्टच्या खिशातून पाचशे रुपये काढून घेतले. तू आम्हाला दारू पिण्यासाठी पैसे देत नाही का. तुला दाखवतो, अशी धमकी देऊन मुलांनी मुकेश बाबुलाल देवासी यांची दोन वाहने पेट्रोल टाकून पेटवून दिली. तसेच इतर वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.