दारू पिण्यासाठी महिन्याला 1000 रुपये खंडणी देण्याची मागणी

0
88

दिघी, दि.14 जुलै (पीसीबी) – तिघांनी मिळून एका सुरक्षारक्षकाला मारहाण करत दारू पिण्यासाठी महिन्याला एक हजार रुपये खंडणी देण्याची मागणी केली. ही घटना 12 जुलै रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास बीयू भंडारी स्कायलाइन हाऊसिंग सोसायटी दिघी येथे घडली.

राजू नामदेव चोरगे (वय 39, रा. दत्तनगर, दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिरण्यात दिली आहे. त्यानुसार समाधान गणेश गंगणे (वय 18), आकाश अण्णा मोरे (वय 24), गोपीनाथ किसन जाधव (वय 20) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बी यू भंडारी स्कायलाईन हाऊसिंग सोसायटी येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या बल बहादुर बिस्ट याला आरोपींनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले. सुरक्षारक्षकाला लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याच्या खिशातून पाचशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर दर महिन्याला एक हजार रुपये खंडणी देण्याची त्यास धमकी दिली. तसेच सोसायटीतील क्लबच्या काचा फोडून नुकसान केले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.