दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून शेतकऱ्याला रॉड ने मारहाण

0
848

तळेगाव दाभाडे, दि. २ (पीसीबी) – दारू पिण्यासाठी पैसे देत नाही या कारणावरून दोघांनी एका शेतकऱ्याला लोखंडी रॉड ने मारहाण केली आहे. हा सारा प्रकार तळेगाव दाभाडे येथे 31 डिसेंबर रोजी रात्री घडला.

यावरून तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात राजेंद्र मारुती शेलार (वय 56 रा. तळेगाव दाभाडे ) यांनी सोमवारी (दि.1) फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी फारूक पठाण (वय 30 ) बादशाह शेलार (वय 30) दोघे राहणार तळेगाव दाभाडे यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या पुतण्याच्या शेडमध्ये बसले होते. यावेळी आरोपी तिथे आले व त्यांनी तो आम्हाला दारू पिण्यासाठी पैसे देत नाही उलट आमचा बाप काढतोस का म्हणत लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यात व तोंडावर मारहाण केली. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.