दारू पिण्यासाठी कोयत्याच्या धाकाने एकास लुटले; वाहनांची तोडफोड

0
119

चिंचवड, दि. 23 जुलै (पीसीबी) – दारू प्यायला पैसे न दिल्याच्या कारणावरून दोन अल्पवयीन मुलांसह तिघांनी मिळून एका व्यक्तीला कोयत्याचा धाक दाखवून लुटले. त्यानंतर परिसरातील वाहनांची तोडफोड केली. ही घटना सोमवारी (दि. 22) मध्यरात्री साडे बारा वाजताच्या सुमारास लिंक रोड, चिंचवड येथे घडली.

संदीप भुजंग कुडुक (वय 31, रा. लिंक रोड, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार्तिक साठे आणि दोन अल्पवयीन मुले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुडुक हे टेम्पो चालक आहेत. त्यांच्या घराजवळ त्यांना आरोपींनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे न दिल्याने त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून कुडुक यांच्या खिशातून 1900 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर दहशत माजविण्यासाठी परिसरातील वाहनांची तोडफोड करून आरडाओरडा केला. पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.