दारूसाठी पैसे न दिल्याने मारहाण

0
75

पिंपरी, दि. 06 (पीसीबी) : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, या कारणावरून एकाने तरुणास लोखंडी टोकदार वस्तूने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. ५) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास रामकृष्ण नगर, पिंपरी येथे घडली.

आकाश दत्तात्रय गायकवाड (वय 24, रा. रामकृष्ण नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रकाश पाटील (वय 24, रा. कैलासनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास आरोपी प्रकाश पाटील यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र फिर्यादी आकाश गायकवाड यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर फिर्यादी हे जेवण करून घराबाहेर थांबले असता आरोपी तिथे आला. त्‍याने फिर्यादी आकाश यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून कोणत्यातरी टोकदार वस्तूने फिर्यादी आकाश गायकवाड यांच्या डोक्यात मारले व त्यांना जखमी करून पळून गेला. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.