दारूभट्टीवर गुन्हे शाखेचा छापा

0
112

साबळेवाडी, दि. १९ (पीसीबी) – खेड तालुक्यातील साबळेवाडी येथे एका दारूभट्टीवर गुन्हे शाखा युनिट तीनने छापा मारून कारवाई केली. यामध्ये 74 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला. ही कारवाई शनिवारी (दि. 18) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस अंमलदार समीर काळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दारूभट्टी लावणाऱ्या एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील साबळेवाडी येथे एस के हॉटेलच्या पाठीमागे डोंगरालगत एका महिलेने दारू भट्टी लावल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी दुपारी दारू भट्टीवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये 3 हजार 700 लिटर कच्चे रसायन आढळून आले. पोलिसांनी 74 हजार रुपये किमतीचे हे रसायन नष्ट केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.