दारूच्या नशेत दुचाकी गमावली

0
576

चाकण, दि. २७ (पीसीबी) – दारूच्या नशेत दुचाकी चालवणे शक्य होत नसल्याने एका तरुणाकडे मदत मागितली. तरुणाने दुचाकीवरून घरी सोडले. त्यानंतर त्याने पैसे मागितल्याने पैसे आणण्यासाठी घरात जाताच तरुण दुचाकी घेऊन पसार झाला. ही घटना 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी पुणे-नाशिक महामार्गावर वाघेवस्ती येथे घडली.

चांगदेव रामदास गायकवाड (वय 41, रा. वाघेवस्ती, चाकण. मूळ रा. अहमदनगर) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चांगदेव यांना दारूची नशा झाल्याने त्यांना त्यांच्या दुचाकीवरून घरी जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यांनी तळेगाव चौकात एका तरुणाला मदत मागितली. माझ्या दुचाकीवरून मला घरी सोड असे म्हटल्याने तरुणाने त्यास नकार दिला. त्याने चांगदेव यांना त्यांच्या दुचाकीवरून घरासमोर सोडले. त्यानंतर त्या तरुणाने चांगदेव यांच्याकडे 100 रुपये मागितले. त्याला 100 रुपये देण्यासाठी ते घरातून पैसे आणण्यासाठी गेले. पैसे घेऊन आले असता तरुण त्यांची दुचाकी घेऊन पसार झाला होता. चाकण पोलीस तपास करीत आहेत.