दारूच्या दुकानासमोरून दुचाकी चोरीला

0
191

हिंजवडी, दि. २२ (पीसीबी) – लक्ष्मी चौक हिंजवडी येथे असलेल्या एका देशी दारूच्या दुकानासमोरून दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार १२ फेब्रुवारी रोजी घडला.

बाबासाहेब उद्धव गायकवाड (वय ३६, रा. विनोदेवस्ती, हिंजवडी. मूळ रा. उस्मानाबाद) यांनी मंगळवारी (दि. २१) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड यांनी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास त्यांची ५० हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १४/जेझेड ८४७५) लक्ष्मी चौकातील देशी दारूच्या दुकानासमोर पार्क केली. सायंकाळी साडेसहा वाजता त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.