दारु पिऊन गोंधळ घातल्याचा आरोप, लक्ष्मण हाकेंच्या वैद्यकीय चाचणीत ‘हे’ सत्य आलं समोर

0
56

पुणे, दि. ०१ (पीसीबी) : ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांच्यावर दारु पिऊन वादावादी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. लक्ष्मण हाके यांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करुन वाद घातल्याचा आरोप काही मराठा तरुणांनी केला. हाके यांनी आरक्षणाच्या वादावरुन धमकी आणि दमदाटी केल्याचा आरोप मराठा तरुणांनी केला. सदर घटना पुण्यातील असल्याचा दावा करण्यात येत असून या संबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. लक्ष्मण हाके यांना पोलिसांच्या ताब्यात दिल्याच या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

लक्ष्मण हाके यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याच्या रिपोर्ट संदर्भात सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. दरम्यान लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केल नसल्याचं निष्कर्ष निघाला आहे. लक्ष्मण हाके यांची ससून रुग्णालयात वैद्यकिय चाचणी करण्यात आली होती. प्राथमिक अहवालात त्यांनी दारु प्यालेली नव्हती असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढलाय. त्यानंतर आणखी खात्री करण्यासाठी लक्ष्मण हाके यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी वैद्यकिय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेत. त्यांचा अहवाल येण्यासाठी आणखी एक दोन दिवस लागू शकतात.

मराठा तरुणांच्या दाव्यानुसार, पुण्यातील एका टेकडीवर लक्ष्मण हाके आपल्या काही सहकाऱ्यांसह बियर पित बसले होते. यावेळी तिथून जात असणाऱ्या मराठा आंदोलकांची लक्ष्मण हाके यांच्यावर नजर पडली. यावेळी त्या आंदोलकांनी लक्ष्मण हाके यांना गाठत तुम्ही माजी राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर खालच्या पातळीची टीका का केली? असा जाब विचारला. लक्ष्मण हाके यांच्यावर मराठा आंदोलकांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय.