दारुबंदी अधिकाऱ्याचा अतिदारु प्यायल्याने मृत्यू

0
163

रायगड, दि. २ (पीसीबी) : देशात आणि राज्यात दारूचं अति सेवन केल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अति दारु सेवन करीत असल्यामुळे विविध आजार उद्भवल्याने काही जणांचा मृत्यू झाला आहे. तरी सुद्धा सर्रार लोक दारु पिताना दिसतात. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दारुबंदी अधिकाऱ्याला दारु अतिसेवन करण्याचं व्यसन होतं. बुधवारी त्यांनी अति दारु सेवन केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याचा नेमका मृ्त्यू कशामुळे झाला यासाठी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. पण मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार त्यांचा मृत्यू हा दारु अतिसेवन केल्यामुळे झाला आहे.

पोलिसांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, बालाजी शिवाजी माने हे दारूबंदी कार्यालय महाड येथे निरीक्षक राज्य उत्पादक म्हणून कार्यरत होते. त्यांना अति दारु पिण्याची सवय होती. बुधवारी त्यांनी दारु अतिसेवन केली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृ्त्यू दारुच्या सेवनामुळे झाल्याने राजगड जिल्ह्यात या प्रकरणाची सगळीकडे चर्चा आहे.