पुणे, दि. ७ (पीसीबी) – मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरातील भ्रष्टाचार उघड करणारे सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ. अमित थढानी यांनी लिहिलेल्या ‘दाभोलकर-पानसरे हत्या : तपासातील रहस्ये’ या मराठी पुस्तकाचे प्रकाशन दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रविवार रोजी सायंकाळी 6 वाजता ‘कोहिनुर मंगल कार्यालय’, प्रभात रस्ता गल्ली क्रमांक 8,गरवारे महाविद्यालय जवळ,कर्वे रोड,पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
या पूर्वी डॉ. थढानी यांनी लिहिलेया ‘रॅशनालिस्ट मर्डर्स’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासावर मराठी भाषेतील हे स्वतंत्र पुस्तक लिहिले आहे.
या पुस्तकाच्या प्रकाशनाला अधिवक्ता भरत देशमुख माजी चेअरमन महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल,मुंबई उच्च न्यायालयातील प्रथितयश फौजदारी वकील ॲड् सुवर्णा आव्हाड,पुस्तकाचे लेखक डॉ.अमित थढानी तसेच ज्येष्ठ हिंदुत्ववादी लेखक आणि गीता विवेक ग्रंथ कर्ते श्री. विवेक सिन्नरकर हे उपस्थित राहणार आहेत. पुस्तकाचे प्रकाशन झाल्यावर मान्यवर वक्त्यांचे उपस्थितांना मार्गदर्शन होणार आहे. हे पुस्तक मुख्यत: डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्यानंतर हजारो पानांची दाखल झालेली आरोपपत्रे, तसेच शेकडो संदर्भ तपासून तयार करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9820291771 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे, असे आवाहन ‘दाभोलकर-पानसरे हत्या : तपासातील रहस्ये’ पुस्तकाचे लेखक डॉ. अमित थढानी यांनी केले आहे.