दापोडी गावात भोसरी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा..

0
608

दापोडी, दि. १ (पीसीबी) – दापोडी गावात भोसरी पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी तीन लाख 41 हजार 900 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.याबाबत सविस्तर मेथीची अशी की, भोसरी तपास पथकातील पोलीस अधिकारी मुकेश मोहरे यांना माहिती मिळाली की, दापोडी गावात तीन पत्ती नावाचा जुगार अड्डा सुरु आहे. त्यानुसार रविवारी गुलाब नगर दापोडी गाव येथे ताज उर्फ इम्तियाज इस्लाम शेख (वय 26, रा. गुलाबनगर, दापोडी) हा त्याच्या मालकीच्या शेडमध्ये तीनपत्ती हा जुगार अड्डा चालवत होता.

पोलिसांनी ताज शेख याला ताब्यात घेतले. त्याच्यासह अन्य पाच जणांकडून तीन लाख 41 हजार 900 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.