दापोडी गावचा पाणीपुरवठा शुक्रवारी सकाळी १० ते रात्री १० पर्यंत बंद

0
72

पिंपरी,पिंपरी, दि २२ जुलै (पीसीबी) :- गुरुवार २५ जुलै २०२४ रोजी पिंपरी चिंचवड शहरामधील दापोडी गावचा पाणीपुरवठा सकाळी १० ते रात्री १० पर्यंत बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवार २६ जुलै २०२४ रोजी दापोडीमधील सर्व भागात होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमीत व कमी दाबाने होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सुर्यवंशी यांनी दिली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पिंपळे गुरव ते दापोडीला जोडणाऱ्या पुलावरील ग्रॅव्हीटी पाईपलाईनचे पाणीपुरवठा विषयक अत्यावश्यक कामकाज करणे गरजेचे असल्यामुळे गुरुवार २५ जुलै २०२४ रोजी पिंपरी चिंचवड शहरामधील दापोडी गावचा पाणीपुरवठा सकाळी बंद राहणार आहे. तसेच दुरुस्तीच्या कामासाठी दापोडी परीसरातील सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे दापोडीमधील सर्व भागात दुस-या दिवशी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमीत व कमी दाबाने होणार आहे. तरी नागरिकांनी महापालिकेकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.