दापोडीमध्ये अल्पवयीन मुलाने स्कॉर्पिओने तीन वाहनांना उडवले; एकाचा मृत्यू

0
64

दापोडी, दि. १८ (पीसीबी)

अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात स्कॉर्पिओ चालवून एक रिक्षा आणि दोन दुचाकींना धडक दिली. यामध्ये रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून दुचाकी वरील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी (दि. 16) रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर एमएसईबी ऑफिस समोर भोसरी येथे घडला.

याप्रकरणी मूर्तजा अमीरभाई बोहरा (वय 32, रा. इंद्रायणी नगर, भोसरी) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाने त्याच्याकडे वाहन चालविण्याचा कोणताही परवाना नसताना मद्यप्राशन करून स्कॉर्पिओ वाहन चालविले. पुणे नाशिक महामार्गावरून जात असताना एमएसईबी ऑफिस समोर भोसरी येथे आल्यानंतर त्याने स्कॉर्पिओने दुभाजकाला धडक दिली. तिथून विरुद्ध दिशेला गाडी नेऊन एक रिक्षा आणि दोन दुचाकींना उडवले. या अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे. तर दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. दापोडी पोलीस तपास करीत आहेत.