दापोडीत फटाके फोडण्यावरून दोन कुटंबात वाद, पती-पत्नीला व मुलींना मारहाण

0
438

दापोडी,दि.०२(पीसीबी) – फटाके फोडल्यावरून झालेल्या वादातून दोन कुटंबीयामध्ये भाडण झाले ज्यामध्ये पती-पत्नी व दोन मुलींना मारहाण करत जखमी केले आहे. याप्रकऱणी भसरी पोलीस ठाण्यात चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा साराप्रकार बुधवारी (दि.29) दापोडी येथील वीट भट्टी येथे घडली आहे.

याप्रकरणी हरीसिंग लच्छी पांचाळ (वय 42 रा, दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात पिर्याद दिली आहे. यावरून अजय शिंदे, महिला आरोपी, आनंद गायकवाड, अशोक साळवी अशी गुन्हा दाखल आरोपीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्यात फटाके फोडण्या वरून भांडण झाले होते. याचाच राग येवून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मुलीमध्ये आल्या असता आरोपीने मुलींच्या डोक्यात ही वीट घालत त्यांना जखमी केले. यवेळी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.