दागिने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या ग्राहकांनी दुकानातून एक लाखाचे मंगळसूत्र पळवले

0
86

दि. २० ऑगस्ट (पीसीबी ) भोसरी,
दागिने खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्स दुकानात आलेल्या पाच ग्राहकांनी कामगाराची नजर चुकवून 98 हजार 766 रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 18) सायंकाळी न्यू गणेश ज्वेलर्स, धावडेवस्ती, भोसरी येथे घडली.

सोहनसिंग जब्बरसिंग देवडा (वय 42, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन महिला आणि दोन पुरुष तोतया ग्राहकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिला आणि दोन पुरुष तोतया ग्राहक फिर्यादी यांच्या न्यू गणेश ज्वेलर्स या दुकानात आले. त्यांना दुकानातील कामगार कालूसिंग जोगासिंग जोधा यांनी मंगळसूत्र दाखवले. त्यांना आणखी मंगळसूत्र दाखवण्यासाठी जोधा हे मागे वळले असता दोन ग्राहक महिलांनी 13.430 ग्रॅम वजनाचे 98 हजार 766 रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून घेतले. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.